फसवणूकीचा नवा फंडा; हॉटेल कर्मचार्‍यांवर चोरीचा आरोप करुन साडेचार हजारांचा गंडा

रत्नागिरी:- हॉटेलमध्ये राहण्यासाठी खोली घेवून हॉटेल कर्मचार्‍यावरच चोरीची खोटी तक्रार करुन साडेचार हजार रुपये उकळणारी महिला रत्नागिरीतून गायब झाली आहे. हॉटेलसह पोलीसांनाही गुंगारा देण्यात महिला यशस्वी झाली. मात्र या प्रकारामुळे फसवणूकीचा नवा फंडा आला कि काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हॉटेल सफारी एशिया येथे दि ५. फेब्रुवारी  दुपारी एक काळसर रंगाची मध्यम वयाची  शितल काळे नामक महिला सिंगल रुम घेऊन राहिली. दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळच्या नाष्टा डबल व  परत एकदा घेऊन खाल्ला तेव्हा तर पाहुण्यांना तिचा प्रकार विचिञ वाटला. त्यानंतर दुपारी साडेअकरा वाजता  महिलेने फोन करुन सांगितले कि बेडशीट खराब आहे. बदली करायला मुलगा पाठवा, रुमबॉय रुममधे गेल्यावर चादर खराब नव्हती.तरी बदली केली, ती महिला रुमबॉय असतानाच बाथरुममधे गेली तर रुमबॉय परत आला.५ मिनिटात महिला रिसेप्शनला येऊन तक्रार  केली. कि  माझ्या पर्समधील ४ हजार ५०० रु.रुपये चोरीला गेले आहेत.तर मला नुकसान लगेच भरुन द्यावे नाहितर मी पोलीस स्टेशनला जाते.रुमबॉय बरेच जुना व विश्वासु असलेने चौकशीत काहिहि गैर आढळ्ले नाही.परंतु ती काळे  खोट बोलत आहे. हे लगेच तिच्या वागण्यावरुन जाणवल.त्यामुळे हॉटेल मालकांनी त्यांना पोलीसात जाण्याचा सल्ला दिला.पोलीस स्थानकात हॉटेलमालक हि तेथे गेले होते. सुरुवारील त्या महिलेने वेगवेगÈया रक्कमा चोरीला गेल्याचे सांगितले.  पोलीसांनी तिचा जबाब नोंदवून विचारपूस केली.पण तपासात ती अनेकदा खोट बोलत आहे.ते पोलीसांच्या लक्षात आले.त्यानंतर त्या महिलेने पोलीसांवरही आरोप करत तेथून बाहेर पडली. पुन्हा हॉटेलमध्ये येवून त्यांनी राडा सुरु केला. पैसे घेतल्याशिवाय न जाण्याची भूमिका घेतली. पोलीस आल्यानंतर ही त्या ऐकत नसल्याने अखेर वरिष्ठ अधिकार्यांनी हॉटेल मलाकांना अखेर पैसे देवून विषय संपवायला सांगितले. त्यानंतर ती महिला निघून गेली. मात्र त्या महिलेवर गुन्हे दाखल असून तीने जेलवारी केल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे फसवणूकीसाठी नवा फंडा शोधल्याचे पुढे आले आहे.