रत्नागिरी:- किरकोळ कारणातून शहरातील वरचा फगरवठार येथील दाम्पत्याला दोघांनी काठीने आणि हातांच्या ठोशांनी मारहाण केली.ही घटना मंगळवार 24 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वा.घडली.
अमोल शंकर आलीम (रा.कर्ला, रत्नागिरी),रोहित पांडुरंग पोकळे (वरचा फगरवठार, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.त्यांच्या विरोधात मनाली दिनेश वालम (30, रा.वरचा फगरवठार, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,मंगळवारी रात्री संशयितांनी त्यांच्या घराच्या अंगणात येउन सासु वैशाली हिला घरात झोपवून घराला कुलुप का लावले असे विचारत संगनमताने मनाली आणि तिचा पती दिनेला मारहाण करण्यास सुरुवात केली.यात अमोलने मनालीच्या डोक्यात उजव्या बाजुला काठी मारली.त्यानंतर रोहितने मनालीचा पती दिनेला हातांच्या ठोशांनी मारहाण करुन त्याचा शर्ट फाडला.याप्रकरणी संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 324,3213,504,506,427,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.