देवघर सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उकलले
गुहागरः– गुहागर तालुक्यातील देवघर येथील नदीकिनारी कुजलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या गणेश माने यांचा खून हा त्याची पत्नी व पत्नीच्या प्रियकराने मिळून केला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी गुहागर पोलिसांनी दोन संशयिताना अटक केली आहे.
गणेश माने हा मूळचा खेड तालुक्यातील आहे. त्याची सासुरवाडी चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील गोपाळवाडी आहे. काहीं दिवसांपूर्वी आपल्या पत्नीला भेटण्यासाठी मार्गताम्हाणे येथे आला होता. माञ त्यानंतर तो परत आपल्या मूळ गावी गेलाच नाही. त्यावेळी तो हरवल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यानंतर एक जून रोजी गणेशाचा मृतदेह गुहागर तालुक्यातील देवघर येथील नदीकिनारी सापडून आला ज्यावेळी हा मृतदेह गुहागर पोलिसांना सापडून आला त्याचवेळी गुहागर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत त्यांच्या चाणाक्ष नजरेत हा प्रथमदर्शनी घातपात असल्याचा दिसून आले आणि मग त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली टीम या तपासात लावली. अखेर हा खून झाल्याचे स्पष्ट होताच आरोपींना मोठ्या शिताफिने पकडण्यात त्यांना यश आले. मृत व्यक्ती गणेश त्याच्या बायकोने आपल्या प्रियकरासोबत हा खून केल्याचे उघड झाले. गणेशच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचेही तपासात समोर येताच गुहागर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून 24 तासाच्या आत गणेशची पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे. भा.द.वि कलम 302,201,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास गुहागर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत करत आहेत.