रत्नागिरी:- महाआवास अभियानांतर्गंत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत विविध पुरस्कार जाहीर झाले असून त्यात तालुक्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार शिवारआंबेरेने पटकावला.
पुरस्कारांचे वितरण रविवारी (ता. 8) दुपारी 3 वाजता जिल्हा परिषद येथील लोकनेते कै. शामराव पेजे सभागृहात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या योजनेत सर्वोत्कृष्ट घरकुल प्रकारात राधिका कृष्णा कुळ्ये (शिवारआंबेरे), निशा भरत शिंदे (टिके), सुनिता रामचंद्र मालप (सत्कोंडी) यांना पुरस्कार देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीत शिवारआंबेरेने 62 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. 50.80 टक्के गुण मिळवत साठरेने द्वितीय तर तृतीय क्रमांक 48.60 टक्के गुण मिळतव नेवरेने मिळवला. सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्कार कोतवडे विभागाला मिळाला आहे. रमाई आवास योजनेत सर्वोत्कृष्ट घरकुल योजनेत रणजित लक्ष्मण जाधव (वरवडे), अनिल पांडुरंग यादव (चवे), मोहन चंद्रकांत पवार (सैतवडे) यांना पुरस्कार दिले आहेत. या योजनेत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीत 54 टक्के गुण मिळवत वळके, हरचिरी 52.67 टक्के तर ओरीने 50.88 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून करबुडे यांना जाहीर करण्यात आला आहे.