रत्नागिरी:- नुकत्याच जाहीर झालेल्या आयएएस परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेला चिपळूण मधील प्रथमेश राजेशिर्के आणि स्वतःच्या मेहनतीवर पोलीस दलात पीएसआय पदावर कार्यरत असणारा तरुण स्वप्नील सावंतदेसाई यांचा वैश्ययुवा संघटनेकडून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रथमेश राजेशिर्के व स्वप्नील सावंतदेसाई यांनी केलेले मार्गदर्शन उपस्थित तरुणांना मोलाचे ठरले. कोकणातील जास्तीत जास्त तरुणांना स्पर्धा परीक्षामध्ये सुयश प्राप्त करण्यासाठी जी लागेल ती मदत देण्याची तयारी दोन्ही तरुणांनी दर्शवली.
प्रथमेश राजेशिर्के व स्वप्नील सावंतदेसाई ह्या दोघांचेही शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरी जिल्ह्यातच झाले आहे. या दोन्ही तरुणांनी कठोर मेहनत करून उज्ज्वल यश संपादन केले. त्यांच्या या मेहनतीची दखल घेत वैश्य युवा संघटनेने या दोघांच्या सत्काराचा कार्यक्रम रविवारी ठेवला होता.
यावेळी प्रथमेश राजेशिर्के यांचा सत्कार लायन क्लबचे माजी अध्यक्ष व छाया उद्योग समूहाचे प्रमुख सुधीर उर्फ अप्पा वणजू यांच्या हस्ते झाला. तसेच पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंतदेसाई यांचा सत्कार उद्योजक प्रवीण मलूष्टे यांचा हस्ते करण्यात आला. त्यावेळी सत्कारमुर्तीचे स्वागत जेष्ठ रंगकर्मी सतीश दळी यांनी केले. त्यावेळी व्यासपीठावर वैश्ययुवाचे वीरेंद्र वणजू देखील उपस्थित होते.
सदर कार्यक्रमामध्ये रत्नागिरी खबरदार च्या आठवा वर्धापनदिन निमित्त पत्रकार हेमंत वणजू यांना शुभेच्छा देण्यात आल्या. व्यापारी महासंघावर अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल श्री गणेश भिंगार्डे यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत चांदेराई गावचे माजी सरपंच संयोग उर्फ दादा दळी यांनी केले. सूत्र संचालन सुनिल बेडखळे तर प्रास्थाविक गौतम बाष्टे यांनी केले. सर्वांचे आभार अँड मनोर दळी यांनी मानले.
या कार्यक्रमाला जेष्ठ रंगकर्मी सुनील उर्फ़ दादा वणजू व वैश्ययुवाचे अभिज्ञ वणजू, हरेश वणजू, अनिश खातू, नागेश जागुष्टे, संगम पाथरे, निल बेर्डे, अँड.निलेश उर्फ भैय्या भिगार्डे, अँड.समीर दामुष्टे, गौरव संसारे, राजा बामणे, स्वप्नील दळी, स्वप्नील पाथरे, मिलिंद दळी, मकरंद उर्फ बाबू खातू, प्रसाद बेर्डे, शेखर दळी, पिंट्या दळी, राजेश कामेरकर, प्रसाद बाष्टे आणि सौरभ मलुष्टे व समाजातील लहान मुले व युवक स्थित होते. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन वैश्य युवा संघटना रत्नागिरी यांनी केले होते.