रत्नागिरी:- राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर 2022-23 या वर्षातील एकूण 17 हजार 471 रिक्त पदांसाठी एकूण 16 लाख 88 हजार 785 उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 11 हजार 956 पदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांना नियुक्तीपत्रे देणे सुरु आहे. व निवडपात्र उमेदवार जिल्हा मुख्यालयात लवकर कर्तव्यार्थ हजर होतील.
पोलीस शिपाई पदाचे एकूण 9 हजार 595 रिक्त पदांकरता एकूण 46 जिल्हा आयुक्तलयांमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यापैकी 45 जिल्हा व आयुक्तालयामध्ये प्रक्रिया पूर्ण झाली आहे व निवडपात्र 7 हजार 23 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे. फक्त मुंबई शहरची मैदानी चाचणी सुरु आहे. चालक पोलीस शिपाई पदाच्या एकूण 1 हजार 686 पदांसाठी एकूण 26 जिल्हा व आयुक्तालयांमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यापैकी 24 जिल्हा व आयुक्तालयांमध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मुंबई शहर व पुणे शहर येथील प्रक्रिया सुरु आहे. तसेच बॅन्डस्मन पोलीस शिपाई यांच्या एकूण 41 पदांसाठी एकूण 14 जिल्हा व आयुक्तालयात भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यापैकी 13 जिल्हा व आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून 17 उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
राज्य राखीव पोलीस बलाच्या 19 गटांमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली असून सर्व ठिकाणी निवडपात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर कारागृह शिपाई यांची 1 हजार 800 पदांसाठी 4 घटकांमध्ये भरती प्रक्रिया सुरु आहे. निवड झालेल्या 11 हजार 956 उमेदवारांमध्ये खुल्या प्रवर्गातील 2890, आर्थिक दुर्बल घटक 1132, एसईबीसी 1097, इमाव 2542, विमाप्र 293, भज-ड 245, भज-क 445, भज-ब 334, विजा-अ 344, अज 1098, अजा 1539 याप्रमाणे समावेश आहे.