रत्नागिरी:- शहराजवळील पोमेंडीखुर्द-साईनगर येथे पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. २) सायंकाळी सात च्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच-०८ एएस २४१८) ही त्यांनी २० मार्च २०२४ ला घराच्या पडवीत पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.