रत्नागिरी:- शहरानजिकच्या पेठकिल्ला राममंदिर येथे दुचाकी पार्क करण्यावरुन दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत एकजण गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
दाऊद दर्वे, इब्राम दर्वे, इब्राहिम धामस्कर (रा. पेठकिल्ला, रत्नागिरी) अशी संशयितांची नाव आहे. ही घटना मंगळवार 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 घडली. संशयित दाऊद दर्वे व त्याचा अल्पवयीन मुलगा पेठकिल्ला येथे गाडी पार्क करत असताना जखमी संदिप चंद्रकांत विलणकर ( 54, रा. पेठकिल्ला, रत्नागिरी) गाडी लावण्यावरुन हटकले याचा राग मनात धरुन दाऊद दर्वेच्या अल्पवयीन मुलांने इब्राहिम धामस्कर व इब्राम दर्वे यांना बोलावून घेतले व संदिप पिलणकर यांला मारहाण केली. दोन गटात झालेल्या या मारहाणीत पिलणकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दोन गटातील या मारहाणीमुळे जिल्हा रुग्णालयात पेठकिल्ला येथील नागरिकांनी गर्दी केली होती. रुग्णालयाच्या पोलिस चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.