रत्नागिरी:- पुणे येथून घरातून बाहेर पडलेली महिला रत्नागिरी जयगड येथे रात्रीच्या सुमारास गस्ती पथकाला दिसल्याने चौकशी करून पोलिसांनी तिला नातेवाईकांच्या ताब्यात दिले. हॉस्पिटलमध्ये जाते असे सांगून घरात परत न आलेली महिला गणपतीपुळे या ठिकाणी रात्रीच्या दरम्याने फिरत होती. यावेळी तिची चौकशी करत पोलिसांनी तिला सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
धनश्री अशोक चेपटे (23 वर्षे राहणार हरपळे वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे) येथून राहत्या घरातून दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये जाते असे सांगून निघाली होती. याबाबत धनश्री अशोक चेपटे यांनी फुरसुंगी पोलीस ठाणे, पुणे शहर या ठिकाणी ती बेपत्ता असल्याची खबर दिली होती.
जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश भागवत हे 7 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्याने गस्त घालत असताना गणपतीपुळे या ठिकाणी महिला फिरत असताना बघितल्यानंतर तिची विचारपूस केली. तिने सुरुवातीला विसंगत उत्तर दिली. मात्र त्यानंतर विचारल्यानंतर तिने सर्व सर्व हकीगत पोलीस निलेश भागवत यांना सांगितली. यानंतर भागवत यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. पोलीस उपनिरीक्षक कुलदीप पाटील, मिलिंद कदम, महिला पोलीस कॉन्स्टेबल सायली गोसले, आदित्य अनकर आदी पोलिसांनी धनश्री चेपटे हिला सुरक्षा देऊन आणि तिची समजूत काढून तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे. सदर महिलेला पोलिसांनी ताब्यात दिले त्यावेळी तिचे आई-वडील आणि मामा उपस्थित होते.