रत्नागिरी:- कोकण किनारपट्टी भागात शनिवार रविवार, सोमवार सलग तीन दिवस जोरदार सातत्य राखल्यानंतर मंगळवारीही पावसाचा जोर कायम होता. जवळपास सात दिवसाचा खंड घेतल्यानंतर पावसाने रत्नागिरीसह कोकणातील सर्व जिल्ह्यात सक्रियता दाखलिी आहे. पुढील ४८ तासात पावसाचा जोर वाढणार असून, त्याला वार्याचीही प्रभावी साथ लाभणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला होता. परिणामी, कोकण किनारपट्टी भागात उकाडा वाढला होता. मात्र, त्यानंतर सक्रिय झालेल्या पावसाने शनिवारी आणि रविवारीही जोर धरला. जोरदार पावसाने हवेत गारठा वाढला. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसह शेतकर्यांनाही दिलासा मिळाला.
रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी संपलेल्या 24 तासात ४६.५२ मि.मी.च्या सरासरीने तब्बल ४१८ मि.मी. एकूण पाऊस झाला. रविवारीही पावसाने 97 मि.मी.च्या सातत्याने दमदार सक्रिता दाखविली होती. गेल्या दोन दिवसात रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यात प्रत्येकी तबब्ल 200 मि.मी. एकूण पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत म्हणजे 1 जून पासून साडेतीन हजाराची निर्धारीत सरासरी पार केली आहे. 104 टक्के पावसाने मजल मारली आहे.
गतवर्षाच्या तुलनेत पावसाच्या पहिल्या तीन महिन्यातच सरासरी ओलांडली आहे. गेल्यावर्षीया कालावधीत 71 टक्यावर पाऊस रेंगाळला होता. रत्नागिरी जिल्ह्यात आर्तापर्यंत सर्वाधिक पाऊस मंडणगड तालुक्यात (3741 मि.मी.) झाला आहे. तर सर्वात कमी पाऊस गुहागर तालुक्यात (2918 मि.मी.) नोंदविला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 31हजार 637 मि.मी.ची एकूण मजल गाठली आहे. पावसाच्या दमदार सातत्यामुळेे खरीप लागवड क्षेत्रात शेतकर्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. भात रोपांच्या वाढीसाठी अनुकुल पाऊस असल्याचा दिलासा शेतकर्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यातील शेतकर्यांची चिंता आता दूर झाल्याची भावना शेतकर्यांमध्ये आहे. मात्र भात खाचरात पाण्याचा निचरा होण्याची खबरदारी शेतकर्यांनी घ्यावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.