रत्नागिरी:- पीक उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पीक उत्पादकता वाढविण्यासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता आता केवळ दोन दिवस शिल्लक असून 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
विविध तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाचे उत्पादन व उत्पादकता वाढवून शेतकर्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध पिकांच्या पिकस्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. कृषी विद्यापीठामार्फत विकसित केलेले तंत्रज्ञान व शेतकर्यांच्या शेतावर उत्पादन यामध्ये दिसून येत असलेली तफावत दूर करून शेतकर्यांनी जास्तीत जास्त उत्पादन वाढवून त्यातून आपल्या उत्पादनामध्ये वाढ करून आर्थिक उन्नती साधणे आवश्यक आहे.
हा उद्देश ठेवून अधिक उत्पादन घेणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भात व नाचणी ही प्रमुख खरीपाची पिके आहेत. या पिकांच्या स्पर्धा तालुका,जिल्हा,राज्य पातळीवर राबविण्यात येत असून अधिक उत्पन्न घेतलेल्या शेतकर्यांचे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येतात.