७९ हजार ५०० रुपये किमतीच्या बॅटऱ्यांवर चोरट्याचा डल्ला
पावस:- तालुक्यातील पावस-गोडबोलेवाडी येथील एअरटेल कंपनीच्या टॉवरच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या. ७९ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्याने डल्ला मारला. पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ डिसेंबरला सायंकाळी पाच ते १ जानेवारी दुपारी साडेबारा या दरम्यान घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुहास दत्ताराम चव्हाण (४४, रा. गव्हाणे, ता. लांजा) हे पावस-गोडबोलेवाडी येथे इंडस कंपनीचा टॉवर असून त्यावर एअरटेल कंपनीचे नेटवर्क आहे. त्या टॉवरचे तळाला पत्र्याची बंदिस्त केबीन असून त्यामध्ये टॉवरला पॉवर देण्यासाठी २.२ व्होल्टेजच्या बॅटऱ्या ठेवलेल्या असून त्या बॅटऱ्या देखरेखीचे काम सुहास चव्हाण करतात. त्या बॅटऱ्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने पळविल्या. चोरट्याने पत्र्याच्या केबीनचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन कंपनीच्या २.२ व्हॉल्टेजच्या एकूण २४ बॅटऱ्या सुमारे ४८ हजार, अमरजा कंपनीच्या ३१ हजार ५०० रुपये किंमतीच्या एचबीएल कंपनीच्या २.२ व्हॉल्टेजच्या बॅटऱ्या
असा सुमारे ७९ हजार ५०० रुपयांच्या बॅटऱ्या चोरट्याने पळविल्या. या प्रकरणी सुहास चव्हाण यांनी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.