रत्नागिरी:- तालुक्यातील पावस येथील देसाई ब्रदर्स कंपनीच्या आवारात झोपलेल्या टेमदेव रामभाउ हांडेकर (33) या कामगाराच्या पायांवरुन ट्रक गेल्याने तो गंभिर जखमी झाला आहे. ही घटना रविवार 14 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वा. घडली असून अधिक उपचारांसाठी त्याला कोल्हापूरला नेण्यात आले आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विराज नंदकुमार शिंदे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात टेमदेव रामभाउ हांडेकर (33) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी पावस येथील देसाई ब्रदर्स या कंपनीतील गोडावूनमध्ये आंबा ठेवण्याच्या कामावर काही कामगार होते. दुपारी ते कामगार तेथील कामगार रुमच्या बाहेर मोकळ्या जागेत झोपले होते. तेव्हा विराज शिंदे हा आपल्या ताब्यातील आयशर ट्रक (एमएच-07-एजे-5642) मधून विजयदुर्ग येथून आंबा भरुन तो देसाई ब्रदर्स कंपनीत उतरवण्यासाठी आला होता. त्यावेळी ट्रक मागे घेताना तेथे झोपलेल्या कामगार याच्या दोन्ही पायांवरुन ट्रकचे क्लिनर बाजुचे पुढील चाक गेल्याने तो गंभिर जखमी झाला. याप्रकरणी चालकाविरोधात भादंवि कायदा कलम 279,337,338 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.