पावसाळ्यातील साथींच्या आजारांना रोखण्यासाठी आरोग्य केंद्रनिहाय आरोग्य पथके

रत्नागिरी:- पावसाळ्यामध्ये फैलावणार्‍या हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया यांसह अन्य किटकजन्य साथींना रोखण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासह प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आरोग्य पथके गठीत करण्यात येणार आहेत.

पावसाळी हंगामामध्ये साथींना गावच्या वेशीबाहेर अटकाव करण्यासाठी आरोग्य विभागाला सज्जतेच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.
येत्या काही दिवसांमध्ये मान्सून दाखल होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर या कालावधीमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकून गुनिया यांसह अन्य किटकजन्य साथींचा गढूळ पाण्यामुळे फैलाव होतो. त्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून आतापासून नियोजन करण्यात यावे, त्यासाठी आरोग्य विभागाने सज्जता राखण्याचे आरोग्य विभागाकडून सूचित करण्यात आले आहे.

पावसाळ्यामध्ये फैलावणार्या विविध साथरोगांना गावच्या वेशीबाहेर रोखण्याचे नियोजन कारवे, दरम्यान, विविध आजारांच्या साथींचा फैलाव होवू नये म्हणून लोकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत आहे.