पाली वळके मार्गावरील दुचाकी अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा

रत्नागिरी:-/तालुक्यातील पाली-वळके मार्गावर दुचाकी अपघातप्रकरणी चालकावर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केल़ा आहे. प्रणय सुरेश घोडेकर (22) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े. अपघातामध्ये दुचाकी चालकासह अन्य एक जखमी झाला होत़ा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणय हा 16 मार्च 2023 रोजी दुचाकी (एमएच 43 सीडी 2950) घेवून पाली ते वळके रस्त्याने जात होत़ा. दुचाकीवरील ताबा सुटल्याने वळके येथे प्रणय याच्या दुचाकीला अपघात झाला होत़ा. यात प्रणय याच्यासह दुचाकीवर मागे बसलेला अघोदीप पिंकू पॉल जखमी झाल़ा. या प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याचा ठपका ठेवत प्रणय याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केल़ा.