रत्नागिरी:- तालुक्यातील पाली-मराठेवाडी येथील पऱ्याच्या पाण्यात अनोळखी पुरुष मृत स्थितीत आढळला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (ता. १५) दुपारी चारच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाली मराठेवाडी येथील खोऱ्याच्या पऱ्याच्या पाण्यात मृतावस्थेत आढळलेल्या पुरुषाचा मृतदेह चार ते सात दिवसांचा असावा असा अंदाज पोलिसांचा आहे. या अनोळखीचे अंदाजे वय ४० ते ४५ आहे. (नाव पत्ता माहित नाही) अधिक तपास पाली दुरक्षेत्राचे पोलिस अमंलदार करत आहेत. ग्रामीण पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.