रत्नागिरी:- मुंबई – गोवा महामार्गावर पाली पोलीस दुरक्षेत्राच्या पोलीस कर्मचा-याकडून वाहतुकीचे नियमन करीत असताना भरधाव वेगाने बेदरकारपणे कंटेनर चालवित येणा-या चालकाची मद्यपान करुन वाहन चालवित असल्याबाबत वैद्यकिय चाचणी करुन रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दुरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पाली पोलीस दुरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, मुंबई – गोवा महामार्गावर पाली पोलीस दुरक्षेत्राच्या पोलीस कर्मचा-याकडून वाहतुकीचे नियमन करीत असताना कोल्हापूर ते मुंबई जात असताना भरधाव वेगाने बेदरकारपणे कंटेनर क्र. (एमएच ४३ यु ५७०९) चालवित येणा-या चालक दत्तात्रय किशन निमगारे (वय ३८ रा. सांगोला) मद्यपान केले असल्याच्या संशयावरुन पाली ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकिय चाचणी करुन त्याचा सकारात्मक अहवाल आल्याने या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पाली पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय चावरे, स्वाती राणे, पोलीस नाईक तटकरी, पोलीस कॉन्स्टेबल सुमित चिले यांनी केली. चालक दत्तात्रय निमगारे याला न्यायालयात हजर केले असता दोन हजार रुपयांचा दंड न्यायालयाकडून ठोठावण्यात आला.