राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
रत्नागिरी:- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबई गोवा महामार्गावरील पाली येथे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गोवा बनावट दारूसह १३ लाख ४४ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्याप्रमाणात गोवा बनावट दारूची वाहतूक महामार्गावरून होत असते. याविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून या मोहिमेअंतर्गत महामार्गावर मोठी कारवाई केली आहे.
मुबंई- गोवा महामार्गावरून एका चारचाकी गाडीतून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती अधिक्षक सागर धोमकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाली येथे वाहनांची तपासणी सुरू केली होती. वाहनांची तपासणी करीत असताना अशोक लेलॅण्ड कंपनीचे ( दोस्त ) सफेद रंगाचे चारचाकी वाहन क्र . (MH – 09 – EM – 8207 ) या वाहनात संशयास्पद बॉक्स आढळून आले. यावेळी बॉक्स उघडून पाहिले असता आतमध्ये गोवा बनावटीची दारू असल्याचे दिसून आले.
या कारवाईत गोवा बनावटी विदेशी मद्याचे 110 बॉक्स अवैधरितीने वहातूक करीत असताना जप्त कलेे. या गुन्हयामध्ये वाहन व वाहनचालकावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ मधील कलम ६५ ( अ ) , ( ई ) , ८१,८३ , ९ ० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या कारवाईत वाहनासह रु .१३ लाख ४४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
ही कारवाई सदरची कारवाई आयुक्त राज्य उत्पादन शुल्क कांतीलाल उमाप, संचालक सुनिल चव्हाण,यांच्या निर्देशानुसार विभागीय उपआयुक्त तडवी, अधीक्षक रत्नागिरी सागर धोमकर व उपअधीक्षक वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण विभागाचे निरीक्षक बापूसाहेब डोणे , दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, जवान अर्शद शेख , दत्तप्रसाद कालेलकर यांनी केली . याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक, एस.ए.भगत , हे करीत आहेत