रत्नागिरी:- तालुक्यातील पानवल फाटा येथे बुधवार 24 मे रोजी दुपारी 3.30 वा. कुरियर टेम्पो साईडपट्टीवरून वर घेत असताना दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शुभम सुनिल पालये (28) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालक तरुणाचे नाव असून ॠतिक संजय कुडतडकर (दोन्ही रा.कापडगाव, रत्नागिरी) हा गंभिर जखमी झालेला आहे. बुधवारी दुपारी संशयित टेम्पोचालक सिध्देश निलकंठ निमकर (रा.बहादूरशेख नाका, चिपळूण) हा आपल्या ताब्यातील टेम्पो (एमएच- 12-टीव्ही- 5186) घेउन हातखंबा ते रत्नागिरी असा येत होता. तो पानवल फाटा येथे आला असता टेम्पाचे चाक साईपट्टीखाली गेल्याने टेम्पा वर घेत होता.त्याच सुमारास शुभम पालये आपल्या ताब्यातील अॅक्टिव्हा दुचाकी (एमएच- 08-ए- 2762) वरुन ॠतिक कुडतरकरला सोबत घेउन रत्नागिरी ते कापडगाव असा जात असताना मागे येणार्या टेम्पोची धडक त्यांच्या दुचाकीला बसल्याने ते दोघेही रस्त्याच्या बाजुला असलेल्या कठ्यावर जाउन यात शुभमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असून ॠतिकवर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्याची कार्यवाही सुरु होती.
या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पानवल फाटा येथे बुधवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालवित असलेला शुभम सुनिल पालये (28) याचा मृत्यू झाला. तर त्याच्या पाठिमागे बसलेला ऋतिक संजय कुरतडकर (दोघेही रा. कापडगाव रत्नागिरी) हा गंभीर जखमी झाला आहे.