रत्नागिरी:- पादचाऱ्याच्या दुखापतीस कारणीभूत झालेल्या दुचाकी स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल संतोष रायकर (वय २४, रा. निवखोल, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १०) सकाळी साडेदहाच्या सुमारास मारुती मंदिर ते माळनाका रस्त्यावर एका दुकानाच्या सुमोर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शहनाज युनुस लांबे (वय ४५, रा. साटवली, ता. लांजा) या शहरातील मारुती मंदिर ते साक्षी फुड दुकानात जात असताना दुचाकी (क्र. एमएच-०८ बीएफ ०७४२) वरिल स्वाराने दुचाकी निष्काळजीपणे चालवून शहनाज लांबे यांना धडक दिली. या अपघातात स्वारासह शहनाज लांबे यांना दुखापत झाली. या प्रकरणी शहनाज लांबे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.