दापोली:- तालुक्यातील आसुदबाग सातारकरवाडी येथे पाखाडीवरुन कार नेण्यास विरोध केल्याच्या रागातून दोघांना मारहाण करण्यात आली . या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवार , दि . ११ जून रोजी दुपारी ३.३० वाजता घडली आहे . चंद्रकांत मोहन चव्हाण ( रा . दापोली , रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे . त्याच्याविरोधात फिर्यादीने ( पोलिसांनी नाव जाहीर केले नाही ) दिलेल्या तक्रारीनुसार , फिर्यादी आणि संशयित आरोपी यांच्यात पाखाडीवरुन वाद आहेत . रविवारी दुपारी संशयित चंद्रकांत चव्हाण हा भाड्याने केलेली चार चाकी मॅजिक वाहन पाखाडीवरुन घेउन जात असताना फिर्यादी आणि साक्षिदार या दोघांनी त्याला विरोध केला . याचा राग आल्याने चंद्रकांतने साक्षीदाराला धक्काबुक्की करुन नखाने ओरखडले . तसेच फिर्यादीच्या छातीच्या वरील बाजूस खांद्याच्यावर दगड मारुन दुखापत करत शिवीगाळ केली . या प्रकरणी त्याच्याविरोधात भा . दं . वि . कायदा कलम ३२४, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.