पळून गेलेल्या संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी:- पोक्सोसह बालविवाह प्रतिबंध कायद्यांअतर्गत अटक असलेल्या संशयित आरोपीला पंचनामा करण्यासाठी पेढांबे येथे घटनास्थळी नेले असता तो फिर्यादीच्या हाताला हिसका मारुन फरार झाला होता. ही घटना ५ जून रोजी घडली होती. या पळालेल्या आरोपीला पोलिसांनी मंगळवारी पकडून. बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी जिल्हा विशेष कारागृहात करण्यात आली आहे.

संशयित आरोपी संदीप आरोपीची बाबू शेळके याच्यावर १७ जिल्हा कारागृहात रवानगी वर्षीय अल्पवयीन युवतीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी पोक्सोसह बालविवाह प्रतिबंध अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. दि. ५ जून रोजी संदीपला पेढांबे येथे घटनास्थळी पंचनाम्यासाठी नेण्यात आले होते. यावेळी फिर्यादीच्या हाताला हिसका देऊन संदीप शेळके पळून गेला होता. त्याला पोलिसांनी पेढांबे येथेच मंगळवारी पकडले व बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याला विशेष कारागृह रत्नागिरी येथे पाठविण्यात आले आहे. अधिक तपास अलोरे – शिरगावचे पोलीस करीत आहेत.