रत्नागिरी:- शहरातील पर्याची आळी येथे प्रौढाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार 25 एप्रिल रोजी सकाळी 7.45 वा.सुमारास उघकीस आली. आत्महत्येमागचे कारण समजू शकलेे नसून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घनश्याम कृष्णा कुष्टे (47,रा.श्रीहरी अपार्टमेंट पर्याची आळी,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे.याबाबत त्यांचा भाउ जयदीप कृष्णा कुष्टे (44) यांनी शहर पोलिसांना खबर दिली.त्यानूसार, शनिवारी रात्री घनश्याम कुष्टे जेवायला आले नसल्याचे त्यांच्या आईने जयदीप यांना सांगितले. म्हणून रविवारी सकाळी जयदीप कुष्टे घनश्याम यांच्या रुमवर गेले असता त्यांना घनश्याम फॅनला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.याबाबत त्यांनी तातडीने शहर पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाउन मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल जाधव करत आहेत.