रत्नागिरी:- छातीत दुखू लागलेल्या प्रौढाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. समीर सतिष नागवेकर (वय ४४, पऱ्याची आळी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १८) रात्री आठच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार समीर नागवेकर यांच्या छातीत दुखू लागलेल्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथील डॉक्टरांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्याचा सल्ला दिला. तेथून रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात आणले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद कऱण्यात आली आहे