रत्नागिरी:- येथील सहायक मत्स्य आयुक्त कार्यालयाबाहेर साखळी उपोषणाला बसलेल्या पर्ससीनेट मच्छीमारांना दिलेली बेकायदेशीर वीज जोडणी तोडण्यात आली. पारंपरिक मच्छीमारांनी आज अचानक मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडकुन हा प्रकार उघड केला. पर्ससीन मच्छीमारांच्या आंदोलनाच्या मंडपाला शासकीय कार्यालयाच्या मिटरमधून बेदायदेशीर वीज दिल्याचे पुढे आले. अखेर वीज जोडणी बेकायदेशीर ठरवुन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून ती तोडुन टाकली.
मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाबाहेर पारंपारिक मच्छीमार एकत्र आले. या मच्छीमारांनी पर्ससीन नेट नौकाचालकांच्या आंदोलनाच्या मंडपात वीज कशी काय दिली, असे विचारताच अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. त्यानंतर ज्या मीटरमधून वीज जोडणी घेतली होती तो वीज मीटर कांदळवन विभागाचा असल्याचे पुढे आले. कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा करताच आली. आमच्याकडून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मीटरमधून वीज घेतल्याचे त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याने महावितरणचे अधिकारी कचाट्यात सापडले. पारंपारिक मच्छीमारांचे उग्ररूप पहातात महावितरणचे अधिकारी कौस्तुभ वसावे यांनी आपली चूक कबूल केली. नगरसेवक सोहेल साखरकरआणि हनिफ मालदार यांनी फोन करून आंदोलकांना वीज जोडण्याबाबत सांगितले होते. तसेच कांदळवन विभागाची परवानगी घेण्याची जबाबदारी त्या दोघांनी घेतली होती. मात्र तशी परवानगी न घेतल्याने वीज चोरी झाल्याचे महावितरणच्या अधिकारी कौस्तुभ वसावे यांनी सर्वांसमक्ष पंचनाम्यात कबूल केले. यावेळी पारंपारिक मच्छीमार नेते आप्पा वांदरकर, राजन सुर्वे, दत्तगुरू कीर, रणजीत भाटकर, रत्नागिरीतालुका पारंपारिक मच्छीमार अध्यक्ष विशाल मूरकर यांच्यासह महिला आणि पुरूष मच्छीमार उपस्थित होते. ३ जानेवारी रात्री आठ वाजता महावितरणने पर्ससीन मच्छीमार आंदोलकांच्या मंडपात वीज जोडून दिली. या वीजेवर चार बल्ब आणि तीन फॅन सुरू होते. या सर्व प्रकाराबाबत पारंपारिक मच्छीमारांनी
महावितरणचा निषेध केला.