रत्नागिरी:- ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी कोकणात मोठ्याप्रमाणात पर्यटक येत असल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मडगाव- पनवेल- मडगाव ही गाडी २१ नोव्हेंबर ते २ जानेवारी या कालवधीत दर रविवारी धावणार आहे.
ख्रिसमस विशेष मडगाव – पनवेल गाडी दुपारी ४ वाजता मडगाव येथून सुटेल. ती दुसर्या दिवशी पहाटे ३:१५ वाजता पनवेलला पोहोचेल. तीचा परतीचा प्रवास पनवेल येथून सकाळी ६.०५ वाजता सुरु होईल. ती त्याच दिवशी सायंकाळी ६:४५ वाजता मडगावला पोचेल. ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, माणगाव आणि रोहा स्थानकावर थांबेल. या गाडीला २२ एलएचबी कोच जोडण्यात आले आहेत. त्यात संमिश्र १ कोच, २ टायर एसी २ कोच, ३ टायर एसी ६ डबे, स्लीपर ६ डबे, दुसरी सीट ४ डबे, पँट्री कार १, जनरेटर कार २ या डब्यांचा समावेश आहे. या गाड्यांसाठीचे आरक्षण २० नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. प्रवास करताना कोविड नियमांचे पालन अत्यावश्यक असल्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.