रत्नागिरी:-दापोली तालुक्यातील दाभोळ येथील समुद्रकिनार्यावर ट्रॉलिंग मासेमारीचा परवाना असताना पर्ससीन जाळ्यांनी मासेमारी करणार्या एका नौकेला 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. श्री महालक्ष्मी असे कारवाई केलेल्या नौकेचे नाव आहे.
समुद्रकिनार्यापासून 2 ते 3 नॉटीकल मैल अंतरावर या नौकेला मासेमारीचा परवाना होता. मात्र पर्ससीन जाळे वापरुन मासेमारी करताना ही नौका आढळल्याने मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त भादुले यांनी 2 लाखांचा दंड ठोठावला. नीतीश नायक (रा. रत्नागिरी) हे या नौकेचे मालक आहेत. त्यांच्या नौकेवरील 12 लाखांचे पर्ससीन जाळे जप्त करण्यात आले आहे. नौकेचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे भादुले यांनी सांगितले.