रत्नागिरी:- नवरात्र उत्सवानिमित्त परटवणे येथे जागतिक हृदयरोग दिनानिमित्त माधावबाग रत्नागिरी यांचे मार्फत कार्डियाक रिस्क असेसमेंट व जिल्हा रुग्णालय रत्नागिरी यांच्यावतीने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर २९ सप्टेंबर रोजी आयोजित केले आहे.
नवरात्र उत्सव मंडळ परटवणे व स्वामी माऊली ट्रस्ट रत्नागिरी व माधावबाग यांच्या वतीने २९ सप्टेंबर २०२२ रोजी सावरकर विद्यालय परटवणे येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात माधवबाग च्या वतीने हार्ट रेट,ई. सी. जी,ब्लड प्रेशर,रॅंडम ब्लड शुगर,spO2,बी. एम्. आय,वैद्यकीय सल्ला,आहारविषयक सल्ला हे सर्व १००० ऐवजी फक्त ५० रुपयात उपलब्ध करून दिले आहे. तर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्यावतीने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर आयोजित केले आहे.
हे शिबीर परटवणे येथील सावरकर विद्यालयात होणार असून या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन नवरात्र उत्सव मंडळ परटवणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.