परचूरी बावनदीपात्रात आणखी एकजण बुडाला

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील परचूरी बावनदी पात्रात पुन्हा एकदा एकजण बुडाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. शिवाजी पांडुरंग लिंगायत (५२, परचुरी) असे बुडालेल्या व्यक्तीचे नाव आहे. येथील ग्रामस्थांनी सायंकाळी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा उशिरापर्यंत शोध लागलेला नाही. 

लिंगायत हे सोनगिरी येथे नातेवाईकांकडे गेले होते. तिथून ते आपल्या घरी परतत असताना बावनदिला ओहोटी असल्याने त्यांनी नदीतून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. ग्रामस्थांना याची माहिती मिळताच या ठिकाणी जमा झाले.  मात्र ते दिसून आले नाही. महिना भारापूर्विच या परचुरी बावनदी पात्रात बुडून दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता ही घटना घडल्याने दुःख व्यक्त होत आहे.

या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक उदय झावरे, पोलिस अमलदार सागर मुरुडकर, सचिन कामेरकर, हेड कॉन्स्टेबल मसुरकर कोंदल यांनी घटनास्थळी धाव घेतली.