पद्म पुरस्कार शिफारस समितीत ना. उदय सामंत यांची निवड

रत्नागिरी:-पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी गठित करण्यात झालेल्या प्रतिष्ठेच्या समितीवर कोकणचे सुपुत्र आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांची निवड झाली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटविणाची खुबी उदय सामंत यांच्यात आहे. वक्तृत्वावर प्रभुत्व आणि हजरजबाबीपणा आदी उत्तम गुणांचा विचार करून या समितीमध्ये त्यांची निवड झाली आहे.

कोकणाला पहिल्यांदा यामध्ये स्थान मिळाले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्याचे निर्देश केंद्र शासनाने राज्य शासनाला दिले आहेत. सर्वोच्च पुरस्कारांपैकी हे पुरस्कार आहेत. त्यासाठी ही समिती गठित केली जात आहे. 26 जानेवारी 2021 ला घोषित होणार्‍या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावाची शिफारस केंद्राकडे करण्यात येणार आहे. पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच उदय सामंत यांच्या रूपाने या समितीत कोकणला स्थान मिळाले आहे. 9 सदस्यांची ही समिती विविध माध्यमातून प्राप्त प्रस्तावांची छाननी करून केंद्र शासनाकडे पाठवण्यासाठी योग्य मान्यवरांच्या नावांची शिफारस राज्य शासन करणार आहे.