रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून पादचारी अमर सदाशिव राजवाडकर (54,रा.राजवाडी भगवतीनगर,रत्नागिरी) यांना धडक देत अपघात करत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्ररणी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना मंगळवार 23 जानेवारी रोजी रात्री 10 वा.कासारवेली येथिल एटीएम मशीन समोरील रस्त्यावर घडली होती.
आर्यन सुभाष लाकडे (21,रा.कासारवेली,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालक तरुणाचे नाव आहे.मंगळवारी रात्री तो आपल्या ताब्यातील अॅक्सेस दुचाकी (एमएच- 08-एवाय- 4495) वरुन भरधाव वेगाने नेवरे ते कासारवेली असा जात होता.त्याच सुमारास अमर राजवाडकर हे कासारवेली येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम समोरुन चालत जात असताना आर्यनच्या दुचाकीची त्यांना जोराची धडक बसली.यात राजवाडकर यांना गंभिर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.याप्ररणी आर्यन विरोधात शहर पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 304(अ),279,337,338 मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.