पत्रकार वारीशे मृत्यू प्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याच्या जामिनावर बुधवारी सुनावणी

रत्नागिरी:- पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यू प्रकरणी संशयित पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर याने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. पंढरीनाथ आंबेरकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. १५ मार्चला त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल.

पोलिसांच्या माहितीनुसार मुंबई-गोवा महामार्गावरिल कोदवली पेट्रोल – पंपासमोरील रस्त्यावर ६ फेब्रुवारी २०२३ ला शशिकांत वारीशे यांचा थार गाडीच्या धडकेत मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारीनंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा संशयिताविरुद्ध दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी संशयित आंबेरकर याला अटक केली. त्याच्याविरुद्ध भादवि कलम ३०२ नुसार राजापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल आहे.