नेवरे येथे बिबट्याचा संचार; मानवी वस्तीत घुसून कुत्र्यावर हल्ला

गणपतीपुळे:- रत्नागिरी तालुक्यातील नेवरे देवपाटवाडी मधील ओंकार महादेव रसाळ यांच्या दारात बसलेल्या कुत्र्यांवर गुरुवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेवरे येथील ग्रामस्थ ओंकार रसाळ यांच्या दारासमोर बसलेल्या दोन कुत्र्यांपैकी एकावर बिबट्याने हल्ला केला परंतु येथील ग्रामस्थांच्या आरडाओरड्यामुळे व कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे बिबट्याला तिथून पळ काढावा लागला परंतु कुत्रा गंभीर जखमी झाला असून वाचण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. याबाबत नेवरे गावचे पोलीस पाटील गणेश आरेकर यांना या घटनेची खबर दिली असल्याचे सांगितले तसेच याबाबतचा सर्व घटनाक्रम वनविभागाला कळविण्यात आले असे सांगितले याबाबत वनविभागाने या परिसरात जाऊन पाहणी अथवा चौकशी सुद्धा केली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये वन विभागाबाबत संताप व्यक्त केला जात आहे यापूर्वी धामणसे सांबरे वाडी परिसरात बिबट्या वाघाचा मुक्त संचार सुरू होता परंतु आता नेवरे परिसरामध्ये बिबट्या वाघाचा मुक्त संचार सुरू झाल्याने ग्रामस्थ मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे