नेपाळी तरुणाची मद्याच्या नशेत आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील जुना माळनाका येथे एका नेपाळी रखवालदाराने दारूच्या नशेत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्यापुर्वी पत्नीशी झालेल्या वादातून त्याने स्वतःच्या हातावर काचेच्या तुकड्याने वार करून घेतले होते. काल मध्यरात्री ही घटना घडली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली आहे.

हरि भक्ता थडेरा (वय ३२, रा. बाबीया चोर ता. पंचपुरी जि. सुरकेत नेपाळ सध्या रा. शंकेश्वर पार्क, जुना माळनाका रत्नागिरी) असे मृत नेपाळी तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी, हरि थडेरा हे रखवालदार म्हणून काम करतात. काल मद्याच्या नशेत त्याने पत्नीशी भांडण झाले. त्यातून त्याने स्वतःच्या हातावर काचेने जखमा करून घेतल्या. त्यानंतर व ओढणीच्या पट्टीने लोखंडी ग्रीलला एक टोक बांधून दुसऱ्या बाजूने गळ्यात फास लावून गळफास घेतला. मानेला झटका बसल्याने हरि थडेरा बेशुद्ध झाला. याबाबत पोलिसांना खबर देणार यांनी गळफासाची ओढणी कापून नातेवाईकांच्या मदतीने रुग्णवाहिकेने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.