रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी – शेल्टिवाडी येथे मागील काही दिवसांपासून बिबट्याची दहशत पसरली आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या मनुष्य वस्तीत घुसून शिकार करत आहे. दोन दिवसांपूर्वीच बिबट्याने घराशेजारी असलेल्या कोबड्याना शिकार बनवले होते.
बिबट्याच्या मुक्त संचारामुळे वाडीतील ग्रामस्थ प्रचंड भयभीत झाले आहेत. मागील काही दिवसांपासून तर बिबट्याचा राजरोस संचार सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाडीतील कोंबड्या आणि गुरांवर बिबट्या हल्ले करत आहे. भयभीत झालेल्या ग्रामस्थांना आपली मुले शाळेत पाठवायची की नाही असा प्रश्न पडला आहे. मानवी वस्तीत फिरणाऱ्या बिबट्याला वन विभागाने जेरबंद करून जंगली भागात सोडावे आणि गावातील ग्रामस्थांना भयमुक्त करावे अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे.