रत्नागिरी:- मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार्या कंटेनरला निवळी घाटात काल बुधवारी रात्रीच्या सुमारास मोठा अपघात झाला. निवळी घाटात आल्यानंतर कंटेनरचे मागील चाक साईट पटटीवरुन खाली उतरल्याने मातीत रुतले याचवेळी चालकाने प्रसंगावधान राखून गाडीतून बाहेर उडी घेतली. कंटेनरमध्ये मोठया प्रमाणात लोड असल्यामुळे कंटेनर जागीच पलटी झाला. गटांगळया खात 100-200 फुट खोल दरीत कोसळला. यामध्ये कंटेनरचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
समोरील बाजूचा चक्काचूर झाला असून बोनेट तुटल्याने दोन भाग झाले आहेत. मात्र एका खडडयात अडकल्याने हा कंटेनर थांबला. अन्यथा आणखी खोल दरीत कोसळून पूर्णतः नुकसान झाले असते. कंटेनर चालक सुखरुप आहे. या अपघाताची नोंद अद्यापपर्यंत पोलीस स्थानकात करण्यात आलेली नाही.