निवळी उपसरपंचांवर विनयभंगाचा गुन्हा

रत्नागिरी:- निवळ उपसरपंच संजय निवळकर यांनी विनयभंग केल्याची तक्रार पिडीत महिलेने ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल केली आहे. पोलीसांनी या तक्रारीवरुन संजय निवळकर यांच्या विरोधात भादंविक ३५४, ३५४ अ, ३५२, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संबधीत महिला संजय निवळकर यांच्यासोबतच कार्यालयात कार्यरत असून संजय निवळकर हे वारंवार मला त्रास देण्याच्या हेतूने बोलत असतात. तर गाव सभेमध्ये त्यांनी माझा हात धरुन मला ओढून माझ्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार ग्रामीण पोलीसांनी निवळी उपसरपंच संजय निवळकर यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.