निर्धारित वेळेनंतरही किराणा दुकान उघडे ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही आपले किराणा मालाचे दुकान उघडे ठेवून ग्राहकांना समक्ष किराणा माल दिल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार 9 मे रोजी दुपारी 11.10 वा.सुमारास  रविंद्रनगर ते कारवांचीवाडी जाणार्‍या रस्त्यावर घडली.

ओमसिंग भवरसिंग पुरोहित (25,रा.भवानीनगर खेडशीनाका,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.याबाबत पोलिस नाईक रोशन चंद्रकांत सुर्वे  यांनी तक्रार दिली होती. त्यानूसार,रविवारी सकाळी ओमसिंग पुरोहित हा आपल्या  मालकीचे  खेतेश्‍वर किराणा मालाचे दुकान उघडे ठेवून स्वतःमुळे कोरोना संसर्ग होउन दुसर्‍यांच्या जीवितास धोका निर्माण होवू शकतो हे माहिती असूनही ग्राहकांना समक्ष किराणा माल देत होता.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.