निरुळमध्ये बिबट्याचा वासरावर हल्ला

पावस:- रत्नागिरी तालुक्यातील निरूळ ठीकवाडी येथील शांताराम नावले यांच्या गोठ्यामधील वासरावर बिबट्याने हल्ला केला. ही घटना गुरुवारी पहाटे घडली. गोठ्यामध्ये जनावरे बांधलेली असताना बिबट्याने पहाटे वासरावर हल्ला केला. काहीतरी आवाज आल्याने घरातील लोकांनी लाईट सुरू केल्याने बिबट्या पळून गेला.

या हल्ल्यांमध्ये वासरू जखमी झाले असून त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. आठ दिवसांपूर्वी याच वाडीतील पाड्यावर रानात चरण्यासाठी गेलेल्या जनावरावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यामुळे दिवसेंदिवस बिबट्याचा वावर वाढत चालल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे.