नारळ काढण्यावरुन वृद्धाला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तुम्ही सर्व झाडावरील नारळ काढू नका फक्त तुमच्या मालकीच्या झाडावरील नारळ काळा असे सांगितल्याच्या रागातून तिघांनी वृद्धाच्या डोक्यात दगड मारुन दुखापत केली. शहर पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.

राजन कृष्णा पिलणकर, सुरज सुभाष कदम ( दोघेही रा. खडपेवठार, रत्नागिरी) व गणेश गोडसे (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) असे संशयित आहेत. ही घटना बुधवारी (ता. ३१) जानेवारीला सकाळी साडेनऊच्या सुमारास खडपेवठार येथे घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रकाश काशिनाथ विलणकर (वय ६०, रा. खडपेवठार, रत्नागिरी) हे त्यांच्या घराजवळील समाईक नारळाच्या बागेत थांबलेले होते. संशयित तेथे नारळ काढण्यासाठी आले असता त्यांनी तुम्ही सर्व झाडावरील
नारळ काढू नका फक्त तुमच्या मालकीच्या झाडावरील नारळ काढा असे सांगितले. याचा राग मनात धरुन संशयित सुरज कदम यांने बागेतील दगड उचलून प्रकाश यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली तर संशयित राजन पिलणकर व गणेश गोडेस यांनी
फिर्यादी यांना शिवगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी प्रकाश विलणकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी तिघा संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.