नारदखेरकी येथे गावठी दारू हातभट्टीवर ‘उत्पादन शुल्क’ची कारवाई; 64 हजारांचा मुद्देमाल जप्त

चिपळूण:- तालुक्यातील नारदखेरकी आंबवकरवाडी येथे गावठी दारू हातभट्टीवर रत्नागिरी उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने धाड टाकून दारू निर्मितीसाठी लागणाऱ्या 28 हजार रुपयांच्या रसायनासह एकूण 64 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

नारदखेरकी आंबवकरवाडी येथे गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त वाय.एम.पवार आणि प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने आंबवकरवाडी येथे धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत 28 हजार लिटर रसायन जप्त केले. जप्त केलेले रसायन नष्ट करण्यात आले. 
 

ही कारवाई निरीक्षक शरद जाधव, व्ही. एस. मोरे, दुय्यम निरीक्षक पी. एस. पालकर, व्ही. पी. हातिसकर, जवान मलिक धोत्रे, जी. एस. कालेकर, वैभव सोनावले, ओंकार कांबळे, एस. एस. नागरगोजे यांनी केली.