नाट्यगृह सांभाळण्याची ताकद आमच्यात आहे

नुतनीकरण शुभारंभाप्रसंगी ना.सामंत यांचे प्रतिपादन

रत्नागिरी:- महाराष्ट्रातील सर्वांत संुदर नाट्यागृह रत्नागिरीतील वि.दा.सावरकर नाट्यगृह आहे. आता हे नाट्यगृह सांभाळण्याची जबाबदारी रंगकर्मी व प्रेक्षकांची आहे. एका कलाकाराने नाट्यगृहाबाबत टिकाटिपणी केली होती. मात्र तेव्हाची वस्तूस्थिती वेगळी होती. त्यामुळे टिका करणार्यांनी आता नाट्यगृह येवून पहावे, नाट्यगृह आमच आहे. ते सांभाळण्याची ताकद आमच्यामध्ये आहे अशा शब्दात ना.उदय सामंत यांनी जेष्ठ अभिनेते भरत जाधव यांनी खडेबोल सुनावले.प्रजासत्ताक दिना दिवशी वि.दा.सावरकर नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचा शुभारंभ ना.सामंत यांच्या उपस्थित रंगकर्मीच्या हस्ते करण्यात आला.

सुमारे दहा कोटी रु. खर्च करुन रत्नागिरीतील वि.दा.सावरकर नाट्यागृहाचे नुतनीकरण करण्यात आले. याचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रसिद्ध उद्योजक रविंद्र उर्फ सामंत, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, मुख्याधिकारी तुषार बाबर, रंगकर्मी समिर इंदूलकर, दादा वणजू यांच्यासह माजी नगरसेवक राजन शेट्ये, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, विजय खेडेकर, वैभवी खेडेकर आदी रंगकर्मी उपस्थित होते.
ना.सामंत म्हणाले, नाट्यगृह सुसज्ज झाले आहे. ते जपण्याची जबाबदारी आता रंगकर्मी व प्रेक्षकांची आहे. खाद्य पदार्थ आत येणार नाहीत याची जबाबदारी पालिकेची आहे. खाद्य पदार्थ आत आल्याचे लक्षात आले तर अधिकार्यांवर कारवाई केली जाईल. नाट्यगृहाच्या कामात त्रुटी राहणार नाहीत याची खबदारी पालिकेने घ्यायची आहे. व्यावसायिक रंगभूमीसाठी २० हजार रु. व हौशी रंगभूमीसाठी १० हजार भाडे आकरण्याची सुचना ना.सामंत यांनी केली.
नाट्यगृहाचे काम पुर्ण करण्यासाठी आपण पालिकेला ७० दिवसांची मुदत दिली होती. मुख्याधिकारी तुषार बाबर, उपमुख्याधिकारी प्रविण माने,इंद्रजित चाळके, अभियंता यतिराज जाधव यांनी ६८ दिवसात नाट्यगृहाचे काम पुर्ण केले. त्यांच्या कामाचे शहरवासियांनी कौतुक केले पाहिजे असे ही ना.सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरीच्या रंगभूमीवरुन उत्तम कलाकार निर्माण झाले पाहिजे, मात्र नाट्यगृहाची दुरावस्था होणार नाही याची दक्षता घ्या, ज्यामुळे नाट्यगृहाची दुरावस्था होईल अशा कार्यक्रमांना नाट्यगृह देण्यात येवू नये, बँकांच्या कार्यक्रमासह शाळांच्या स्नेहसंमेलनाला नाट्यगृह देण्यात यावेत. त्यातून बाल कलाकार निर्माण होतील असा विश्वास ना.सामंत यांनी व्यक्त केला.