नाट्यगृहाचे बिल थकले, महावितरणने थेट कनेक्शन कापले

रत्नागिरी:- वीज बिल थकल्याने स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहाचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीने तोडुन पालिकेला दणका दिला. त्यामुळे सावरकर नाट्यगृह अंधारात आहे. मात्र पालिकेने तातडीने हातपाय हालवत १ लाख बील भरल्यानंतर पुन्हा वीज जोडण्यात आली. शहरातील स्ट्रीट लाईटचेही ३५ ते ४० लाखाचे वीज बिल थकीत आहेत. त्याबाबतही पालिकेला महावितरण कंपनीने नोटीस बीजवली आहे.

पालिकेने नाट्यगृहाचे १ लाखाचे बील थकीत ठेवले. थकीत बीलाने मेटाकुटीस आलेल्या महावितरणने अखेर सावरकर नाट्यगृहाचे वीज कनेक्शन तोडले. वीज पुरवठा सुरू नसल्याबाबत नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांनी महावितरणशी संपर्क साधला यानंतर ही बाब समोर आली. १ लाख रुपयाचे थकीत बिल भरल्यानंतर महावितरण कंपनीने नाट्यगृहामध्ये पुन्हा विद्युत पुरवठा सुरू केला. शहरातील स्ट्रीट लाईटचा देखील हाच गंभीर विषय आहे.