नाचणे येथे बंद फ्लॅट फोडून 1 लाख 25 हजारांची चोरी

रत्नागिरी:- शहरानजीकच्या नाचणे येथील सदनिका फोडून अज्ञाताने तब्बल 1 लाख 24 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला.ही घटना बुधवार 17 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 2.45 वा.कालावधीत घडली आहे.

याबाबत शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार,अज्ञाताने फिर्यादींच्या नाचणे येथील रुक्मिणी आर्केड येथील सदनिकेच्या मुख्य दरवाजाचे लॅच कोणत्यातरी हत्याराने उचकटले.त्यानंतर आतमध्ये प्रवेश करुन बेडरुममधील कपाटातील सोन्या-चांदिचे दागिने,रोख रक्‍कम चोरुन नेली.यामध्ये 10 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र,80 ग्रॅम चांदीचे ब्रेसलेट,20 ग्रॅम चांदीची अंगठी,10 ग्रॅम चांदीचे दोन कानातील बाळी आणि रोख 1 लाख रुपये असा एकूण 1 लाख 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबवला.याप्रकरणी अज्ञाताविरोधात भादंवि कायदा कलम 454,380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.