नाचणे येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यास तपासून मृत घोषित केले. शांताराम शंकर सावंत (वय ८७, रा. छत्रपतीनगर, नाचणे, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १४) दुपारी दीडच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शांताराम सावंत यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तात्काळ नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.