रत्नागिरी:- शहरालगतच्या नाचणे येथील बस स्टॉपवर बसची वाट पहात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या गळ्यातील चेन खेचून पळणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्वैत संदेश चवंडे, रौफ इक्बाल डोंगरकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना 29 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे 29 जुलै रोजी नाचणे बस स्टॉपवर उभे असताना अद्वैत चवंडे याने तुझ्या गळ्यातील चेन मला दे असे सांगितले. त्याला फिर्यादी यांनी विरोध केला. मात्र रौफ डोंगरकर याने फिर्यादीच्या खांद्यावर हात ठेवून पकडून ठेवले. त्याचवेळी अद्वैत याने चेनचा फासा तोडून शिवीगाळ करत ढकलून दिले. गळ्यातील चेन जबरदस्तीने काढून दुचाकीवरुन पळून गेले.