चिपळूण:- तालुक्यातील नागावे येथील रेश्मा राजेंद्र चव्हाण यांची सव्वा लाखांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. या प्रकरणी राजेशकुमार मिश्रा याच्यावर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना २ नोव्हेंबर रोजी घडली.
रेश्मा चव्हाण बांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची एसबीआय लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी आहे. त्या दरवर्षी २४ हजार ७९६ रूपये वार्षिक हप्ता भरत असतात. यावेळी हा हप्ता ऑनलाईनद्वारे भरणा केला होता. मात्र, ही रक्कम एसबीआय इन्शुरन्स पॉलिसीमध्ये जमा झाली नाही असे त्यांचे एजंट लीना कोलगे यांच्याकडून समजले.. त्यानंतर आरोपी शर्मा याने सौ. चव्हाण यांना फोन करून विमा पॉलिसीच्या हप्त्याची रक्कम परत मिळेल असे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांच्या मोबाईलवरील गुगल पे अॅपवर पेमेंटची प्रोसेस करण्यास सांगितले. यावेळी त्यांच्या गुगल पे वरून ६५ हजार १२३ तसेच ४० हजार १०१ व पुन्हा २० हजार १२३ इतकी रक्कम शर्मा याने स्वतःच्या अकाऊंटवर घेतली व त्यांची १ लाख २५ हजार ३४७ रूपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी अधिक तपास अलोरे पोलिस करीत आहेत.