नाईक हायस्कूलमधील चोरी प्रकरणात एकाला दोन वर्ष सश्रम कारावास

रत्नागिरी:- चार वर्षांपूर्वी येथील नाईक हायस्कूलमधील सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल लांबवल्याच्या आरोपातील चार आरोपींपैकी एकाला २ वर्ष सश्रम कारावास आणि १५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद तर दुसऱ्या आरोपीला १ वर्ष चांगल्या वर्तणुकीच्या अटीवर १० हजार रुपयांच्या बंधपत्रावर मुक्त “करण्यात आले असून अन्य दोघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. हा निकाल मुख्य न्यायदंडाधिकारी चौत्रे यांनी दिला आहे.

अकिब जिक्रिया वस्ता (२२, रा. राजीवडा, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मोहम्मद अदनान इरफान वस्ता (१९, रा. नवा कर्ला, रत्नागिरी) याची बंधपत्रावर मुक्तता करण्यात आली असून उजैफ तन्वीर वस्ता (१९, रा. आदमपूर राजीवडा, रत्नागिरी) आणि मकबुल सल्लाद्दीन दाव्त (१९, रा. राजीवडा बांध, रत्नागिरी) या दोघांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यांच्याविरोधात अश्फाक मुश्ताक नाईक (४५, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्ररकणी शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.