नांदीवडेतील चैताली पांचाळ खून प्रकरणातील संशयिताला न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी:-तालुक्यातील नांदिवडे येथे प्रेमप्रकरणातून चैताली पांचाळचा खून करणार्‍या संशयिताला न्यायालयाने रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.

समीर प्रकाश पवार (22, सध्या रा.नांदिवडे अंबुवाडी, रत्नागिरी) असे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. समीरने चैतालीची खून करुन ती आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला होता.परंतू जयगड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून समीरला अटक केली.

बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.रविवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने समीरला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.