नांदिवली येथे एकास किरकोळ कारणातून मारहाण

खेड:- खेड तालुक्यातील नांदिवली दंडवाडी येथे एकास किरकोळ कारणातून मारहाण झाल्या प्रकरणी एकावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना १३ मार्च रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. अशोक दत्ताराम कदम (रा नांदिवली दंडवाडी) असे त्या गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे तर या प्रकरणी श्रीराम काशिराम कदम रा. विहाळी नांदिवली, ता. खेड यांनी तक्रार दाखल केली आहे.

यातील संशयित याने नांदिवली दंडवाडी रस्त्यावर एक महीन्यापुर्वी फिर्यादी यांचेकडे मागणी केल्याप्रमाणे फिर्यादी यांनी संशयितास कुंबळी झाडाचा लाकडी दांडका दिला नाही. याचा राग मनात धरुन त्याने श्रीराम कदम यांच्या पाठीमागुन येवुन अचानक त्याचे हातातील लाकडी दांडक्याने डोक्यावर तसेच उजवे कानावर दुखापत करून शिवीगाळी व दमदाटी केली.